ती गेली तेंव्हा रिमझीम पाऊस निनादत होता.....!!
ती आई होती म्हणूनी …..घन व्याकुळ मी ही रडलो… त्यावेळी वारा सावध…... पाचोळा उडवीत होता ....l ती गेली तेंव्हा रिमझीम पाऊस निनादत होता.....ll अंगणात गमले मजला .., संपले बालपण माझे.. खीडकीवर धुरकट तेंव्हा ... कंदील एकटा होता... ती गेली तेंव्हा रिमझीम पाऊस निनादत होता.....ll १६ सप्टेंबर २0२0 हा दिवस आमच्या आयुष्यातील अतिशय काळाकुट्ट दिवस म्हणावा लागेल...ती काळरात्र आम्ही कधीच विसरणार नाही .. त्या आधी दोनच दिवसापूर्वी तिचा फोन आला होता... मला दोन दिवसात भेटून जा एवढचं म्हणाली होती... तिचं ते बोलावणं मला आजही अगम्य वाटत आहे. जणू काही काळाची झडप तिला दिसत होती....