सलोखा.
माझ्या मते आई हि एक निखळ मैत्रीण असते .आपण लहान असताना अनेक छोट्या छोट्या गोष्टीत ती आपल्या सोबत रमलेली असते ,रंगून जाते .त्याचबरोबर माझ्या बाळाला अमुक एखादी गोष्ट वेळेवर मिळाली पाहिजे असा तिचा कटाक्ष असतो म्हणजेच एक जबाबदारीची जाणीव असते . आता प्रश्न उरतो तो आपण., म्हणजे तिचे बाळ जेव्हा मोठे होते,तेव्हा तिची आपल्या पुढेमागे जी लगबग चाललेली असते त्याकडे आपण कोणत्या भूमिकेतून बघतो याची . तिने आपल्यासाठी अनंत कष्ट उपसलेले असतात याची जाणीव ठेवून आपण तिच्या वयपरत्वे वर्तनाकडे किंवा भावनिक गरजेकडे पाहणे अपेक्षित असते. तेव्हा कुठे आपण तिने आपल्यासाठी केलेल्या अनंत उपकारातून थोडेफार तरी उतराई होऊ . जी सहज समर्पित वृत्ती आईकडे असते तसाच तिच्या वृद्धापकाळात सुद्धा आपण तिचा आधारवड झाले पाहिजे, तेव्हाच तिचे जीवन कृतार्थ होईल .अर्थात हे सगळं करत असताना आपणही आई आणि पाल्य या दोन्ही भूमिका तितक्याच समर्थपणे पेलणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपल्या स्वभावात अनुकंपा पाहिजे . एकमेकांबद्दल आदर पाहिजे दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेण्याची वृत्ती पाहिज...