जिंदगी जिंदादिली का नाम है...!!
''Time and tide, wait for none....''
" वेळ आणि समुद्राची भरती - ओहोटी कोणासाठी थांबत नसते. "
आपल्या आयुष्याचं हि असच असते . जन्माला आल्यापासून .. ते बालपण , तारुण्य , प्रौढत्व , आणि शेवटी वृद्धापकाळ म्हणजेच आयुष्याच्या अखेरची संध्याकाळ हि संध्याछाया म्हणजे रात्रीपूर्वीचा पर्वकाल..जीवनाच्या अनंताचा वेधकाल महत्त्वाचा असतो. सांजवातीसारखा शांत, शीतल आणि सुखदायी.., पण सर्वांनाच या शीतलतेचा स्पर्श होत नाही. त्यासाठी स्वच्छ मनाची तेलवात असायला हवी. या काळात शरीर शिथिल होत असत, थकलेलं असत. सर्व जबाबदाऱ्या पार पडलेल्या असतात. आणि डोळे पैलतीराला लागलेले असतात. अशाही परिस्थितीत आनंदाचे डोही ... आनंद तरंग निर्माण कारण्याचे काम जो करील तोच खरा सुखी आणि आनंदी म्हणता येईल .
'दिसणं तसं वागणं' फार महत्वाचं असंत . दुसऱ्यांच्या मताचा आदर करायला शिकलं पाहिजे. ते ज्यांना जमत नाही ते आयुष्याच्या अखेरच्या पर्वात निराश, दुःखी कष्टी , हताश होतात. उतारवयातील सुखाचा मूलमंत्र त्यांना गवसत नाही.
'मृत्यू' अटळ आहे. उत्पत्तीनंतर विनाश आहेच. सकाळ नंतर मध्यान , संध्याकाळ आणि रात्र हा प्रकृर्तीचा नियम आहे. आपल्या वागण्यांने आयुष्याच्या संध्याकाळी त्या मृत्यूला सामोरे जाण्याची तयारी केली तर सगळीकडे आनंदी आनंदच दिसेल. म्हणून स्वतःही आनंदी राहा आणि इतरांना हि आनंद देण्याचा,आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे मन प्रसन्न होते. दुसऱ्याला हसताना पाहताना एक प्रकारचं आत्मिक समाधान लाभतं... निदान मला तरी लाभतं.! !
स्वतःही हसतमुख असावं आणि दुसऱ्यांनाही प्रसन्न ठेवावं, म्हणजे रोजच्या धावपळीच्या जीवनातील टेन्शन कमी होऊन आपलं जगणं कसं ग्रेसफूल होऊन जातं. आणि जीवनाचा अर्थ याहून वेगळा काय असू शकतो ..? जो सदैव प्रसन्न असतो , त्यानं जग जिंकलं असं समजावं . जीवनाचा अर्थ त्याला खऱ्या अर्थाने काळाला असचं म्हणावे लागेल. आणि म्हणूनच सदा हसत राहा , आनंदी राहा , दुसऱ्यांनाही आनंदी ठेवा. स्वतःबरोबर दुसऱ्याचं ही आयुष्य घडवा .... वाढवा.....!
म्हणूनच म्हटलं जातं ... जिंदगी जिंदादिली का नाम है...!!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा