अत्यंत खेदजनक बाब...!! आज दिनांक २२ / ५ / २०२१ , खरं तर खूप वाईट वाटत आहे हे लिहिताना. कालची गोष्ट नेहमीप्रमाणे दैनंदिन पेपर वाचणे हा माझा नेहमीचा शिरस्ता . पेपर हातात घेतल्याबरोबर ब्रेकिंग न्यूजवरून नजर फिरली. आक्खा पेपर दोन तीन वेळा उलथा- पालथा करून झाला. पण काहीतरी मिसिंग वाटत होतं ... आज आंतरराष्ट्रीय चहा दिवसाची जाहिरात सगळ्याच पेपर च्या फ्रंट पेज वर होती. पण जी बातमी वाचायला माझी नजर भिरभिरत होती ती बातमी मात्र मला शेवटच्या पानापर्यंत कुठंही दिसली नाही. फार खट्टू झालं मन. पण म्हंटल असुदे कदाचित उद्याच्या पेपर मध्ये उपरती होईल. पण छे .... आज हि भ्रमनिरासच झाला. आपल्या देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांचे आज तीसावे पुण्य स्मरण .... आजच्याच दिवशी म्हणजे २१/५ /१९९१ ला..,,बरोबर तीस वर्षांपूर्वी त्यांची अत्यंत थरारक रीतीने हत्त्या करण्यात आली. आणि आज जाणीवपूर्वक गांधी कुटुंबीय हे जणू या देशातील खलनायक आहेत असं चित्र निर्माण केलं जातंय. आजच्या पिढीला कदाचित गांधी कुटुंबियांचे या देशासाठीचे...