अत्यंत खेदजनक बाब...!!




       आज दिनांक २२ / ५ / २०२१ , खरं तर खूप वाईट वाटत आहे हे लिहिताना.  कालची गोष्ट नेहमीप्रमाणे दैनंदिन पेपर वाचणे हा माझा नेहमीचा शिरस्ता . पेपर हातात घेतल्याबरोबर ब्रेकिंग न्यूजवरून  नजर फिरली. आक्खा पेपर दोन तीन वेळा उलथा-  पालथा करून झाला. पण काहीतरी मिसिंग वाटत होतं ... आज आंतरराष्ट्रीय चहा दिवसाची जाहिरात सगळ्याच पेपर च्या फ्रंट पेज वर होती. पण जी बातमी वाचायला माझी नजर भिरभिरत होती ती बातमी मात्र मला शेवटच्या पानापर्यंत कुठंही दिसली नाही.

फार खट्टू झालं मन. पण म्हंटल असुदे कदाचित उद्याच्या पेपर मध्ये उपरती होईल. पण छे .... आज हि  भ्रमनिरासच झाला.

आपल्या देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांचे आज तीसावे पुण्य स्मरण .... आजच्याच दिवशी म्हणजे  २१/५ /१९९१ ला..,,बरोबर तीस वर्षांपूर्वी  त्यांची अत्यंत थरारक रीतीने हत्त्या करण्यात आली. आणि आज जाणीवपूर्वक गांधी कुटुंबीय हे जणू या देशातील खलनायक आहेत असं चित्र निर्माण केलं जातंय.  आजच्या पिढीला कदाचित गांधी कुटुंबियांचे या देशासाठीचे योगदान माहित नाही... आणखी काही वर्षांनी त्यांना ती दंतकथा वाटणार नाही याची जबाबदारी आणि खबरदारी आपण एक सुजाण नागरिक म्हणून घेणे नक्कीच गरजेचे आहे.

           मला सांगा इतकी दुर्लक्षित करण्यासारखी होती का हो हि गोष्ट... का आपण इतक्या कोत्या मनाने वावरतोय... की आता आपल्या लेखणीवरही अंकुशआलाय की काय..?  कुठं चाललीये आपली सद्सद्विवेकबुद्धी... असे प्रश्न पडल्यावाचून राहिले नाहीत. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून दिमाखाने वावरताना आपण कोणाच्या दबावाला तर बळी पडत नाही ना याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. 

केवळ लिहायचे म्हणून नाही लिहीत आहे मी.... बारीक निरीक्षण,,, समाजातील बदलते विचार प्रवाह यांच्यामुळे विचारांना एक भक्कम बैठक प्राप्त झाली आहे. राष्ट्रीय वृत्तपत्र म्हणून नावलौकिक असताना आपल्याकडून अशी अक्षम्य चूक होऊच कशी शकते...  काही वृत्तपत्रांनी आदरांजली वाहिली आहे... पण तिथे हि लक्षात येण्यासारखा मुद्दा आहे कि त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी किंवा प्रवक्त्यांनी; सरचिटणिसांनी अगदी सदगदित होऊन श्रद्धांजली अर्पण केली आहे..... आपल्याकडून हे कर्तव्य कसे काय चुकले,,,  राजीव गांधी हे एकमेव असे व्यक्तिमत्व होते ज्यांनी या देशात डिजिटल क्रांतीचा पाय रचला ... संगणकयुगाला सुरुवात करून दिली.. आणि त्याच डिजिटल मीडियाचा गैरवप करून गांधी कुटुंबियांबद्द्दल गैरसमज पसरविण्याचे पातक जाणीवपूर्वक विघातक मनोवृत्तीचे लोक वेळोवेळी  करत असताना दिसून येतात. स्वर्गीय राजीव गांधी हे या देशाचे एक महान व्यक्तिमत्व होते. या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नेत्याचा अनुल्लेख मनाला पटणारा नाही. देशाचा पंतप्रधान हे पद तरी किमान पक्षीय राजकारणाच्या मर्यादेमध्ये संकुचितपणे अडकले जाऊ नये एवढीच माफक अपेक्षा ...

असो ... अनेक वृत्तपत्रांचा आढावा घेऊनच प्रस्तुत लेख लिहिण्याचे धाडस केले आहे,  वृत्तपत्रे हि
जनजागृतीचे एक धगधगते हत्यार आहे हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपण अनुभवत आलो आहोत तेव्हा आपली लेखणी नेहमी निष्पक्षपातीपणे व सत्याच्या बाजूने तळपती तलवार असली पाहिजे याची जाण आणि भान ठेऊन या लेखाचा समारोप करते. 

डिजिटल इंडियाचे स्वप्न सत्यात उतरविणाऱ्या  स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...!!

                                                                                                                                                          अरुणादेवी स. कुरणे                                                                                                                         सहा. प्राध्यापक.                                                                                                                             शिक्षणशात्र विभाग, मुंबई विद्यापीठ.

                                                                                                                               

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जिंदगी जिंदादिली का नाम है...!!