पोस्ट्स

इमेज
    अत्यंत खेदजनक बाब...!!        आज दिनांक २२ / ५ / २०२१ , खरं तर खूप वाईट वाटत आहे हे लिहिताना.  कालची गोष्ट नेहमीप्रमाणे दैनंदिन पेपर वाचणे हा माझा नेहमीचा शिरस्ता . पेपर हातात घेतल्याबरोबर ब्रेकिंग न्यूजवरून  नजर फिरली. आक्खा पेपर दोन तीन वेळा उलथा-  पालथा करून झाला. पण काहीतरी मिसिंग वाटत होतं ... आज आंतरराष्ट्रीय चहा दिवसाची जाहिरात सगळ्याच पेपर च्या फ्रंट पेज वर होती. पण जी बातमी वाचायला माझी नजर भिरभिरत होती ती बातमी मात्र मला शेवटच्या पानापर्यंत कुठंही दिसली नाही. फार खट्टू झालं मन. पण म्हंटल असुदे कदाचित उद्याच्या पेपर मध्ये उपरती होईल. पण छे .... आज हि  भ्रमनिरासच झाला. आपल्या देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांचे आज तीसावे पुण्य स्मरण .... आजच्याच दिवशी म्हणजे  २१/५ /१९९१ ला..,,बरोबर तीस वर्षांपूर्वी  त्यांची अत्यंत थरारक रीतीने हत्त्या करण्यात आली. आणि आज जाणीवपूर्वक गांधी कुटुंबीय हे जणू या देशातील खलनायक आहेत असं चित्र निर्माण केलं जातंय.  आजच्या पिढीला कदाचित गांधी कुटुंबियांचे या देशासाठीचे...

ती गेली तेंव्हा रिमझीम पाऊस निनादत होता.....!!

               ती आई होती म्हणूनी …..घन व्याकुळ मी ही रडलो…      त्यावेळी वारा सावध…... पाचोळा उडवीत होता ....l   ती गेली तेंव्हा रिमझीम पाऊस निनादत होता.....ll अंगणात  गमले  मजला  .., संपले बालपण माझे..      खीडकीवर धुरकट तेंव्हा ... कंदील  एकटा होता...   ती गेली तेंव्हा रिमझीम पाऊस निनादत होता.....ll           १६  सप्टेंबर  २0२0 हा दिवस आमच्या आयुष्यातील अतिशय काळाकुट्ट दिवस म्हणावा लागेल...ती काळरात्र आम्ही  कधीच विसरणार नाही .. त्या आधी दोनच दिवसापूर्वी तिचा फोन आला होता... मला दोन दिवसात भेटून जा एवढचं म्हणाली  होती... तिचं ते बोलावणं  मला आजही अगम्य वाटत आहे. जणू काही काळाची झडप तिला दिसत होती....
अनुभव.
  कोविड - १९ चा समाज आणि शिक्षणावरील परीणाम :  एक मंथन

सलोखा.

इमेज
               माझ्या मते आई हि एक निखळ मैत्रीण असते .आपण लहान असताना अनेक छोट्या छोट्या गोष्टीत ती आपल्या सोबत रमलेली असते ,रंगून जाते .त्याचबरोबर माझ्या बाळाला अमुक एखादी गोष्ट वेळेवर मिळाली पाहिजे असा तिचा कटाक्ष असतो म्हणजेच एक जबाबदारीची जाणीव असते . आता प्रश्न उरतो तो आपण., म्हणजे तिचे बाळ जेव्हा मोठे होते,तेव्हा तिची आपल्या पुढेमागे जी लगबग चाललेली असते त्याकडे आपण कोणत्या भूमिकेतून बघतो याची . तिने आपल्यासाठी अनंत कष्ट उपसलेले असतात याची जाणीव ठेवून आपण तिच्या वयपरत्वे वर्तनाकडे किंवा भावनिक गरजेकडे पाहणे अपेक्षित असते. तेव्हा कुठे आपण तिने आपल्यासाठी केलेल्या अनंत उपकारातून थोडेफार तरी उतराई होऊ . जी सहज समर्पित वृत्ती आईकडे असते तसाच तिच्या वृद्धापकाळात सुद्धा आपण तिचा आधारवड  झाले पाहिजे, तेव्हाच तिचे जीवन कृतार्थ होईल .अर्थात हे सगळं करत असताना आपणही आई आणि पाल्य या दोन्ही भूमिका तितक्याच समर्थपणे पेलणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपल्या स्वभावात अनुकंपा पाहिजे . एकमेकांबद्दल आदर पाहिजे दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेण्याची वृत्ती पाहिज...

जिंदगी जिंदादिली का नाम है...!!

इमेज
     ''Time and tide, wait for none....''       " वेळ आणि समुद्राची  भरती - ओहोटी कोणासाठी  थांबत  नसते. "            आपल्या आयुष्याचं हि  असच असते . जन्माला आल्यापासून .. ते बालपण , तारुण्य , प्रौढत्व , आणि शेवटी वृद्धापकाळ  म्हणजेच आयुष्याच्या  अखेरची संध्याकाळ  हि संध्याछाया म्हणजे रात्रीपूर्वीचा पर्वकाल..जीवनाच्या अनंताचा वेधकाल महत्त्वाचा असतो. सांजवातीसारखा शांत, शीतल आणि सुखदायी.., पण सर्वांनाच  या शीतलतेचा  स्पर्श होत नाही. त्यासाठी स्वच्छ  मनाची तेलवात असायला हवी. या काळात शरीर  शिथिल होत असत, थकलेलं  असत. सर्व जबाबदाऱ्या पार पडलेल्या असतात. आणि डोळे पैलतीराला लागलेले असतात. अशाही परिस्थितीत आनंदाचे डोही ... आनंद तरंग निर्माण कारण्याचे काम जो करील तोच खरा सुखी आणि आनंदी म्हणता येईल .             'दिसणं तसं  वागणं'  फार महत्वाचं असंत .  दुसऱ्यांच्या मताचा आदर करायला शिकलं पाहिजे. ते ज्या...